2nd floor, Utkarsh Plaza, P. No. 04, In Front of Pragati Vidya Mandir, Khajamiya to IMR College Road, Jalgaon-425001

About Us

Our History

नोबेल फाउंडेशन गेल्या सहा वर्षांपासून ग्रामीण तसेच शहरी भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान बाबत जागरूकतेसाठी आणि संशोधन वाढीसाठी कार्य करीत आहे.  2014 मध्ये नोबेल प्राइज चळवळीच्या माध्यमातून नोबेल फाउंडेशनचा पाया रोवला गेला. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. या शतकात महासत्ता होण्यासाठी प्रत्येक भारतीयाला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात गोडी निर्माण करावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपल्याला विज्ञानाचा वसा द्यावा लागेल. मात्र आजही आपला समाज अंधश्रद्धा, अनिष्ट रूढीपरंपरा यात अडकलेला आहे. जात, धर्म, पंथ याद्वारे द्वेषाची परिस्थिती आहे.

जर प्रत्येक विद्यार्थी विज्ञाननिष्ठ आणि संशोधनाप्रति बांधिलकी असणारा घडत असेल तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, म्हणूनच नोबेल फाउंडेशन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करीत आहे. समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. या तिघांनी ठरवले तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडतील. नोबेल फाउंडेशन या तीनही घटकांच्या सेवेसाठी हातात विवेकाची मशाल घेऊन कार्य पथावर आहे. जळगाव सारख्या ग्रामीण जिल्ह्यातून ही चळवळ सुरू झालेली आहे या चळवळीला आता व्यापक करूया. आमच्यासारख्या तरुणांना पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्या पाठिंब्याची आणि पाठीराख्यांची आवश्यकता आहे. जसे प्रत्येक घरात भगवंताचे देवघर आहे तसे प्रत्येक घरात ग्रंथालय आणि प्रयोगशाळा आणणे हे आमचे स्वप्न आहे. पुस्तकमय कुटुंब आणि प्रयोगमय विद्यार्थी यासाठी सर्वांनी मिळून काम करूया. आम्ही तरुणाईला सकारात्म कता, सत्य आणि विवेकाकडे घेऊन जाण्यासाठी बांधील आहोत. चला, आपण सारे मिळून भारताला विज्ञान क्षेत्रात विश्वगुरू बनविण्यासाठी एकत्र काम करूया. 

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा (NSTS)

            नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा (NSTS) दरवर्षी महाराष्ट्रभर आयोजित केली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून मेरीट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्रो), आयआयटी, आयआयएम यासारख्या उच्च शैक्षणिक संस्थांना विनामूल्य सहलीला नेण्यात येते. तसेच मेरिट मधील तीनशे विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वैज्ञानिक साहित्य बक्षीस म्हणून दिले जाते. इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थी या परीक्षेला पात्र असून विज्ञान क्षेत्रातील ही राज्यातील अग्रगण्य परीक्षा समजली जाते.

Our Teachers and staff

Jaydip M. Patil (M.Sc. Chem)

Prof. Chemistry

Yogesh Patil (M.Sc. Maths)

Prof. Mathematics

Harshal Thakur

Prof. Biology

Prajakta Rajput

Prof. Chemistry

Rajendra Patil

Staff (Accountant)

Amol Pawar

Staff (NSTS State Coordinator)

Events

Your Future Starts Here.