सर्व विद्यार्थी आणि पालकांना कळविण्यात येते की, नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्थेतर्फे 2021 या वर्षासाठी घेतलेल्या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा(NSTS) अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. ऍडव्हान्स परीक्षेचे गुण ,मुलाखतीचे गुण आणि परीक्षेत बसलेल्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या नुसार मेरिट लावण्यात आलेले आहे. एकूण 53 विद्यार्थ्यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो,आयआयटी, आयआयएम सहलीसाठी निवड करण्यात आलेली आहे. इतर विद्यार्थ्यांनी उत्तम अभ्यास करून परीक्षा दिली सर्वांचे अभिनंदन. पुढील वर्षाच्या NSTS परीक्षेसाठी शुभेच्छा.

NSTS 2022 या परीक्षेची अधिकृत घोषणा 12 जानेवारी 2022 रोजी www.nobelfoundation.co.in वर करण्यात येईल

कोरोना निर्बंध संपल्यानंतर सहल नेण्यात येईल असे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कळविले जाईल धन्यवाद !!

जयदीप पाटील
संचालक, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा